
अभियंत्यांच्या हलगर्जीपणामुळे मणी-लवेल रस्ता २३ जूनपासून बंद , जवळपास १०-१२ गावांचा संपर्क तुटला
खेड तालुक्यातील अत्यंत महत्वाचा तर प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटाला पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जाणार्या सवेणी-वाणी- लवेल- आंबडस- बेलसई रस्त्यावरील नव्याने बांधलेली मोरी पहिल्याच पावसात वाहून गेल्यामुळे २३ जूनपासून पूर्ण रस्ताच बंद असल्याने जवळपास १०-१२ गावांचा संपर्क तुटला आहे. याबाबत कार्यकारी अभियंता यांचा हलगर्जीपणा समोर येत असल्याचा आरोप खेड तालुका प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक आंब्रे यांनी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
www.konkantoday.com