हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग यांचं निधन
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरभद्र सिंग यांचं निधन झालं आहे. गुरुवारी शिमला येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणारे विरभद्र सिंग यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनक राज यांनी दिली आहे.
www.konkantoday.com