शासकीय तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
राज्याच्या तंत्रशिक्षण संचाचलनालयाने इयत्ता दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेशाकरिता नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्जाची पडताळणी केल्यानंतरच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक, मोबाईल नाही अशांनी नजिकच्या सुविधा केंद्रात जावून ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने कागदपत्रांची पडताळणी करूनच ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. अर्जाच्या छाननीची पद्धत निवडून आवश्यक कागदपत्रांच्या कॉपी विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर अपलोड करावयाच्या आहेत. अर्ज निश्चित करण्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
www.konkantoday.com