व्हेल माशाच्या उलटीची किंमत पाच कोटी ,तस्करी करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील आरोपी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात
रत्नागिरी जिल्ह्यातून मोटारसायकलवरून व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेवून जात असलेल्या इसमास रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने लोणेरे येथे अटक केली. त्याच्याकडून सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६ जुलै रोजी दुपारी मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे २०० मीटर अंतरावर मौजे लोणेरे गोरेगाव जाणार्या रोडवर अब्दुल मुतबिन महम्मद जाफर (४५, रा. सवणस खुर्द, ता. खेड, जि. रत्नागिरी) हा दुचाकीवरून व्हेल माशाची उलटीचे लहान मोठे आकाराचे तुकडे बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची एक सिल्व्हर रंगाची सुझुकी ऍक्सेस मोटरसायकल व पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची वांती (उलटीचे लहान मोठे तुकडे) असा एकूण ५ कोटी ५० हजार रुपये किंमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
www.konkantoday.com