विश्वासाने ठेवलेल्या नोकराने दिला दगा ,तीन लाखांच्या दारूच्या बाटल्या घेऊन झाला पसार, रत्नागिरी कुवारबाव मधील प्रकार
रत्नागिरी शहरातील कुवारबाव येथील न्यू समता परमिट रूम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या लॉंयर्ड व्हिक्टर डिसोजा याच्याकडे मोठय़ा विश्वासाने हॉटेलची जबाबदारी सोपवली असता त्याने तीन लाख रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या घेऊन पळ काढल्याने त्याने फिर्यादी व मालकाची फसवणूक केल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लॉंयर्ड व्हिक्टर डिसोजा (रा.कुडाळ, सिंधुदुर्ग ) यांचेकडे विश्वासाने परमिट रूम हॉटेलची मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली होती परंतु त्यांने हॉटेलमधील सुमारे ३ लाख ९ हजार ८८०रुपयांच्या दारूच्या विविध ब्रँडच्या बाटल्या घेऊन पळ काढला. ही घटना रविवार ४जुलै रोजी सायंकाळी ते सोमवारच्या सायंकाळी ७वा.कालावधीतकुवारबाव येथील न्यू समता परमिट रूम हॉटेलमध्ये घडली.नोकर लॉंयर्ड व्हिक्टर डिसोजा याचे वर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात राजेश दिनकर बिरबोळे ( मूळ रा.भुदरगड, कोल्हापूर सध्या रा. रत्नागिरी) यांनी बुधवारी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत.
www.konkantoday.com