गोव्याच्या मद्यधुंद पर्यटकांचा सिंधुदुर्गात राडा! पोलिसांशी हुज्जत अन् दादागिरी,


आंबोलीत गेलेल्या ओल्ड गोवा आणि बार्देस येथील दहा ते बारा युवा “राईडर्सनी” थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांशी झटापट केल्याचा प्रकार घडला.यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडे सहा वाजता पोलिस ठाण्यात घडली.मंगळवारची बांदा बाजारपेठ बंद असल्याने, बांदा येथील पाच पर्यटक आंबोली येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. आंबोली घाट उतरत असताना दापोली येथे त्यांनी गोव्यातील दुचाकीस्वारांना बाजूला होण्यास सांगितले. यावरून वाद सुरू झाला. गोव्यातील सुमारे १० ते १२ तरुण आंबोली पर्यटन स्थळावर एकत्र आले होते. त्यांनी बांदा येथील कारचा पाठलाग केला. दाणोली येथील पोलीस नाक्यावर कार थांबताच, गोव्यातील तरुणांनी एकत्र येऊन हेल्मेटने कारवर आदळत दादागिरी केली. त्यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच होता. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी लावून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आबा पिळणकर आणि सुनील नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोव्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोव्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कार चालकही तेथे पोहोचले होते. पोलिसांनी विचारपूस करत असतानाच, गोव्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झालीया घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, शरद लोहकरे, अमित राऊळ, आबा पिळणकर, सुनील नाईक आणि अन्य पोलिसांनी गोव्यातील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button