
रत्नागिरी शहरातील झाडगाव – परटवणे रोडवर गांजा विकणाऱ्याला अटक
रत्नागिरी शहरातील झाडगाव – परटवणे रोड दरम्यान शहर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत १० हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी केली. या कारवाईत गणेश पांडुरंग वाडेकर याला ताब्यात घेतले शहरातील झाडगाव – परटवणे रोड दरम्यान नदीकिनारी एक तरुण गांजा विक्री करत असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांना मिळाली होती. या माहितीवरून या परिसरात पोलिसांनी पाळत ठेवली होती. या मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा निर्णय घेऊन झाडगाव-परटवणे परिसरात सापळा रचला होतागांजा विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला असता, गांज्याच्या ५ पुड्या एका इसमाकडे सापडल्या. या गांज्याची किंमत १० हजार १२० रुपये असून, पोलिसांनी गणेश पांडुरंग वाडेकर याला ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com