मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याची घटना ,सांगली इस्लामपूर मधील प्रकार

सांगलीतील वैद्यकीय क्षेत्रातून एकामागून एक धक्कादायक घटना समोर येत आहेत. दोन डॉक्टरांवर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे आरोप ताजे असतानाच आता इस्लामपुरातही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवून मृतदेहावर दोन दिवस उपचार केल्याची व त्यापोटी नातेवाईकांकडून हजारो रूपये उकळल्याची घटना सांगलीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी इस्लामपुरातील आधार हेल्थ केअर हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button