
भाजप चिपळूणतर्फे तालुक्यात ४ हजार झाडे लावणार -विनोद भोबस्कर
भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत डॉ. शामप्रसाद मुखर्जी जयंती निमित्त संपूर्ण देशात भाजपतर्फे सेवा सप्ताह सुरू आहे. या सेवा सप्ताह निमित्ताने चिपळूण तालुक्यात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या आदेशाने चिपळूण तालुका अध्यक्ष विनोदभाई भोबस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम सुरू आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष विनोदभाई भोबस्कर यांनी चिपळूण तालुक्यात ४ हजार झाडे वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडला आहे.
www.konkantoday.com