
त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये”-खासदार विनायक राऊत
ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये” असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला. भाजपचे खासदार नारायण राणेंनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणं ही आता गरज आहे. खूप पदं रिक्त असल्यामुळे थोड्या मंत्र्यांवर अधिक भार पडत आहे. ते योग्य पध्दतीने कामकाज करू शकत नाहीत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे क्रम प्राप्त आहे. ते करताना कोकणातील वाढत्या शिवसेनेचा प्रभाव लक्षात घेऊन कुणाची तरी वर्णी लागत असेल, तर हे शिवसेनेचं मोठेपण आहे
पण ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये. त्यांनी यापूर्वीची आणि आताची शिवसेना अनुभवलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे. ते पुसण्याचं काम करू शकत नाही.
www.konkantoday.com
