जगबुडी नदीवरील देवणे बेटावर साकारणार क्रोकोडाईल पार्क आमदार योगेश कदम यांची माहिती


खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीवरील देवणे या निसर्गरम्य बेटावर क्रोकोडाईल पार्क आणि बोट क्लब उभारण्यासाठी राज्य शासनाने ९ कोटी रुपयांच्या निधीला मजूरी दिली असल्याने खेडवाशियाचे बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्कचे गेल्या अनेक वर्षाचे स्वप्न साकार होणार आहे. जगबुडी नदीवरील देवणे बेट पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे ही राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची संकल्पना असून ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता.
या बाबत माहिती देताना आमदार योगेश कदम म्हणाले, कोकण हा निसर्गसमृद्ध प्रदेश असल्याने इथे पर्यटनाला मोठा वाव आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीचा किनाराही असाच निसर्गरम्य आहे. येथील देवणे या बेटाजवळ असलेल्या डोहामध्ये मोठ्या प्रमाणात
मगरीचा वावर असून येथील खडकावर या मगरी बिनधास्तपणे पडलेल्या पहावयास मिळतात
या निसर्गरम्य बेटाचा पर्यटनदृष्ट्या विकास करून या ठिकाणी कोकणच्या पर्यटनात भर पडेल असे क्रोकोडाईल पार्क आणि बोट क्लब उभारावे अशी संकल्पना माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडली होती.
या बाबतचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करून निधी मंजूरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या ९ कोटी रुपयांच्या निधीला
मंजूरी मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरवात होणार असून या माध्यमातून खेडमध्ये पर्यटन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी गेस्ट हाऊस उभारले जाणार असून या ठिकाणी बोटींगची सुविधा असणार आहे. देवणे डोहामध्ये विहार करणाऱ्या मगरींचे पर्यटकांना सुरक्षितपणे दर्शन घडविले जाणार असून नदीपात्राचेही सुशोभि केले जाणार असल्याचे
योगेश कदम यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
जगबुडी नदीवरील देवणे बेटाचा पर्यटन दृष्ट्या विकास व्हावा, या ठिकाणी बोट क्लब आणि क्रोकोडाईल पार्क व्हावे हे खेडवाशियांचे स्वप्न होते. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने या कामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने खेडवाशियांनी उराशी बाळगलेले
हे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button