कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय होणार
अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असतानाच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून (८ जुलै) कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे.
www.konkantoday.com