
अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन
काेराेनाच्या महामारीमुळे इतर क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे
रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून कोरोनामुळे ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. जिल्ह्यातील एक लाख १३ हजार १५३ विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ३० हजार ८८३ पाठ्यपुस्तकांची मागणी शिक्षण विभागाकडून ‘ बालभारती’कडे करण्यात आली होती. मात्र, अद्याप पाठ्यपुस्तके प्राप्त न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच पुस्तकांद्वारे अध्यापन करावे लागत आहे.
शिक्षकांनी गतवर्षीच्या विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके गोळा करून मुलांना वितरित केली आहेत. ऑनलाईन अध्यापनामुळे विद्यार्थी जुनीच पुस्तके वापरत आहेत
www.konkantoday.com