संगमेश्वर तालुक्यातील असंख्य ग्राहकांचे नादुरूस्त विद्युत मीटर बदलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
महावितरण कंनी अधिकार्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे संगमेश्वर तालुक्यातील असंख्य ग्राहकांचे नादुरूस्त विद्युत मीटर बदलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. वीज बिलाची रक्कम वेळीच जमा न केल्यास ग्राहकांचे कनेक्शन तोडणार्या कंपनी अधिकार्यांनी नादुरूस्त मीटर बदलाकडे दुर्लक्ष केले आहे.
नादुरूस्त मीटरमुळे ग्राहकांच्या विद्युत मिलात अनपेक्षितरित्या वाढ होत आहे. अधिकार्यांच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील असंख्य ग्राहकांना वाढीव बील भरण्याबाबत नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
www.konkantoday.com