
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण व्हावे या मागणीसाठी दि. ९ ऑगस्टला मानवी साखळीसह काळ्या फितीचे अभियान राबविले जाणार -संजय यादवराव
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण व्हावे या मागणीसाठी दि. ९ ऑगस्टला चिपळुणात मानवी साखळीसह काळ्या फितीचे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती कोकण हायवे समितीचे प्रमख संजय यादवराव यांनी दिली. ऑगस्ट क्रांतीदिनी चिपळूणच्या बहाद्दूरशेख नाका येथून अभियानाचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याचे श्री. यादवराव यांनी सांगितले.
चिपळूण शहरातील बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती श्री. यादवराव यांनी पत्रकार परिषदेत दिली. ऍड. ओवेस चिपकर, अन्वर पिचकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, चिंतामणी उर्फ पप्पू सप्रे, राजेंद्र शिंदे, निसार शेख, पत्रकार, समिती पदाधिकारी आदी मान्यवर बैठकीला उपस्थित होते.
www.konkantoday.com