आदरणीय नारायणराव राणे साहेबांना मंत्रीपद.कोकण विकासासाठी आणि भा.ज.पा.साठी ऊर्जा स्तोत्र ठरेल – अॅड. दीपक पटवर्धन.
आदरणीय नारायणराव राणे यांना पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून दायित्व दिले याचा मनापासून आनंद होतो. आदरणीय राणेसाहेब यांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात आदराची भावना असून कार्यकार्याला बळ देणारे हे नेतृत्व. केंद्रीयमंत्री म्हणून विराजमान होत असल्याचा आनंद अवर्णनीय आहे. रत्नागिरीतील सर्व कार्यकर्ते राणेसाहेबांना मंत्रीपद मिळाल्याने आनंदी आहेत. राणेसाहेबांचे मंत्रीपद रत्नागिरी भा.ज.पा. संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण करेल. वर्षोनवर्षे राजकीय सत्तापदा पासून निराधार झालेल्या भा.ज.पा. कार्यकर्त्यांना बळ मिळेल. भा.ज.पा.ची ताकद लक्षणीय वाढलेली पाहायला मिळेल. राणेसाहेबांच नेतृत्व हे विकासाभिमुख, कणखर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व आहे. केंद्रामधून रत्नागिरी विकासाच्या योजना, अनेक उद्योगधंदे रत्नागिरीमध्ये येथील रत्नागिरीच्या कोकणाच्या विकासाची स्वप्न पूर्णत्वाला जातील असा विश्वास वाटतो. राणेसाहेबांचे केंद्रीयमंत्री म्हणून रत्नागिरीमध्ये स्वागत करण्यासाठी रत्नागिरी भा.ज.पा. अधीर आहे. मोदीसाहेबांनी जनसामान्यातील नेतृत्वाला केंद्रीय मंत्रीपद दिल्याने कोकणात भा.ज.पा.ला प्रचंड बळ मिळेल. कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. नारायण राणेसाहेबांचे दैदिप्यमान वाटचालीसाठी शुभेच्छा! अशी प्रतिक्रिया जिल्हा भा.ज.पा. अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.