मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम वेगाने सुरू
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना आपल्या गावी येताना मुंबई -गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाट पार करावा लागतो. परंतु पुढील वर्षीपर्यंत ही चिंता कायमची मिटणार आहे. कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्याचे काम दिवसरात्र सुरु अाहे या बोगद्यामुळे ४०मिनीटांचा प्रवास अवघ्या १०मिनिटात होणार आहे. प्रवासाचे अंतर साडेचार किलोमीटरने कमी होणार असून प्रवास सुखकर होणार आहे मुंबई-गोवा
महामार्गाच्या इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्यातील चौपदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
www.konkantoday.com