सातबार्‍यावरुन नाव कमी करण्यासाठी लाच घेणारा निवळी येथील तलाठ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले

मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा देण्यासाठी लाच घेणार्‍या तलाठ्याला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाद्वारे सोमवारीसायंकाळी सुमारास रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
राजेश इंदल गुसिंगे (३७, रा. खेडशी, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मृत आईच्या नावे संयुक्तिक नावाने भोके गावात जमीन आहे.तक्रारदाराने निवळी येथील तलाठी कार्यालयात मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा देण्यासाठी अर्ज केला होता.
तेव्हा तलाठी राजेश गुसिंगे याने त्यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तडजोडिनंतर १५०० रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदराने २ जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करून लाचेची १५०० रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून राजेश गुसिंगेला रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर,पोलीस शिपाई गावकर यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button