शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांच्या पाहणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव तालुका दौरा करणार
ग्रामीण विकासासाठी केंद्र, राज्य शासनाने जाहीर केलेल्या विविध योजनांच्या पाहणीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे दि. १२ ते २० जुलै या कालावधीत तालुकास्तरीय दौरा करणार आहेत. प्रत्येक पंचायत समितीत आढावा बैठक घेवून पत्रकारांची मते संवादाद्वारे जाणून घेण्याचा स्तुत्य उपक्रम श्री. जाधव यांनी सुरू केला आहे.
रत्नागिरी पंचायत समिती दि. १२ जुलैला दुपारी २ वाजता श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. दुपारी ३.३० वाजता श्री. जाधव पत्रकारांशी संवाद साधून सायंकाळी ४ वाजल्यापासून रत्नागिरी तालुक्यातील योजनांची पाहणी सुरू करणार आहेत.
www.konkantoday.com