विदर्भासह कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज

विदर्भासह कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपर्यंत (ता. ९) पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पोषक वातावरणाच्या अभावामुळे राज्यात मॉन्सूनची वाटचाल गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. सोमवारी मात्र कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडला.
दरम्यान, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी बुधवारपासून पोषक वातावरण तयार होणार आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button