
दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक.
दुचाकीवरुन विवाहितेला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार गुहागर तालुक्यातील मळण रस्त्यालगतच्या जंगलमय भागात घडून आला.तालुक्यातील चिखली चांदिवडेवाडी येथील सदाशिव उर्फ सदा महादेव गवंडी (वय ४७) याने संबंधित विवाहित महिलेला शृंगारतळी येथे सोडतो, असे सांगून त्याच्या दुचाकीवर बसवले. मात्र, त्याने तसे न करता वेळंब फाट्यावरुन मळण दिशेने तिला नेऊन रस्त्याच्या बाजूला असणार्या जंगलमय भागातील झाडी-झुडूपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.याबाबतची तक्रार पिडीत महिलेने गुहागर पोलिस ठाण्यात केली असून पोलिसांनी या आरोपीवर आयपीसी ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी मिळाली आहेwww.konkantoday.com