मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती ,गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरु

मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर येत आहे. त्याच वेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे.
मध्यम स्वरुपात बसत असलेल्या तालुक्यातील पणदेरी येथे माती धरणास ५जुलै रोजी मोठी गळती लागली आहे. यंदाच्या बांधकाम हंगामात धरणाचे मजबूतीकरणाचे काम होऊवूनही गळती लागल्याने व गेल्या आठ दिवसांपासून पावसाने तालुक्यात दडी मारलेली असतानाही गळती लागलेली असल्याने पंदेरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.
प्रशासनाने गळती थांबवण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत गळतीमुळे जीवतहानी होऊ नये याकरीता त्या परिसरातील ग्रामस्थांना पंणदेरी जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्थलांतर करण्यात आले आहे.येथील धरण परिसरात दापोली प्रांताधिकारी शरद पवार,मंडणगड तहसीलदार नारायण वेगुर्लेकर यांच्यासह रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वैशाली नाडकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकुमार काशीद, पोलीस निरिक्षक उत्तम पठे, पोलीस निरिक्षक संजय आंब्रे, पोलीस उपनिरिक्षक सुशांत वराळे घटनास्थळी हजर आहेत.
प्रशासनाने करीत असलेले उपाय –
गळती ठिकाणी पिचिंग करण्याचे काम सुरू आहे. पाणी गळती होणाऱ्या ठिकाणी पोत्यातून माती भरून भराव केला जात आहे. शंभरहून अधिक कामगार घटनास्थळी काम करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button