नगरपालिकेच्या कॅमेर्यात कैद होऊनही काही नागरिकांची ती सवय सुटत नाही
रत्नागिरी शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगरपालिकेने पावले उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून गेले काही वर्ष कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मात्र त्याचा वापर न करता काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी रस्त्याजवळ कचरा फेकत असतात
बेशिस्त पणे रस्त्यावर कचरा टाकणार्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी पालिकेने शहरात १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र तौक्ते वादळाचा फटका या कॅमेर्यांना बसला. त्यापैकी ४ कॅमेरे बंद पडले आहेत. त्याची दुरूस्ती सुरू आहे. परंतु २४ तास कॅमेर्यांचा वॉच असूनही काही नागरिक सवयीप्रमाणे कचरा टाकतच आहेत. यापैकी एकावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे पालिकेचा लाखोंचा खर्च निष्फळ ठरत आहे.
बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पालिकेला कठोर पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पटवर्धन हायस्कूलसमोरील कचराकुंडीसमोर कॅमेरा बसवूनही उपयोग झालेला नाही. आरोग्य सभापती निमेश नायर यांनी शुक्रवारी सीसीटीव्ही कॅमेर्यांबाबत माहिती घेतली. तेव्हा हे सत्य पुढे आले. मोबाईलला हे सीसीटीव्ही कनेक्ट आहेत. अनेक नागरिक बेशिस्तपणे कचरा टाकताना दिसत आहेत. मात्र पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या या बेशिस्तपणे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याच्या सवयीत बदल होताना दिसत नाही
www.konkantoday.com