
खासगीकरणाच्या विरोधात मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक
नवीन मोटार वाहन कायद्याच्या अनुषंगाने नवीन वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत करण्याची प्रक्रीया सुरु करुन केंद्र सरकारने मोटार वाहन विभागाच्या खासगीकरणाचाच घाट घातला आहे. जनहिताच्या कोणत्याही सुधारणेस संघटनेचा विरोध नाही, पण सुधारणांच्या नावाखाली सुरु असलेल्या खासगीकरणाला विरोध आहे. त्यामुळे मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असून, बुधवारी (ता.७) रोजी राज्यभरात आरटीओतील कर्मचारी रस्त्यावर उतरून निदर्शने करणार आहेत.
www.konkantoday.com