कोल्हापूर मधील व्यापाऱ्यानी आनंदोत्सव साजरा केला
शहरातील तीन महिने बंद असलेली दुकाने सोमवारी सुरू झाल्यानंतर व्यापार्यांनी आनंदोत्सव साजरा केला. महाद्वार रोड, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी येथील दुकाने सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली. ‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’ असे सूचना फलक दुकानांवर लावलेले होते.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात होता. सर्व दुकाने सुरू झाल्याने शहरात गर्दी वाढली होती. दुपारी चारनंतर शासनाच्या नियमांचे पालन करून दुकाने बंद केल्याने शहरातील वर्दळ काहीशी कमी झाली
www.konkantoday.com