विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप , खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं
विधानसभेतील गदारोळ प्रकरणी आज भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. संजय कुटे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, अशिष शैलार, नारायण कुचे, पराग अळवणी, शिरीष पिंपळे, योगेश सागर, किर्तीकुमार बागडिया या सदस्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही सरकारला उघडं पाडलं आहे. १२ काय १०६ आमदाराचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही. हक्कभंग आणला तरी फरक फडणार नाही. शिवी देणारे कोण होते? शिवसेनेच्या सदस्यांनी शिवी दिली. तेव्हा आमचे सदस्य आक्रमक झाले. मराठा व ओबीसी आरक्षण देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षने देवेंद्र फडणवीस यांनी केला.विधीमंडळाच्या पावासाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले, एवढच नाही तर अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. यावरू आज भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. परिणामी भाजपाने सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. असं फडणवीस म्हणाले.
www.konkantoday.com