लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘दाऊ केमिकल्स’कडून चिपळूण तालुक्यातील पांच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णांसाठी बिछाने वाटप
चिपळूण/- लोटे औद्योगिक वसाहतीतील ‘दाऊ केमिकल्स’कडून चिपळूण तालुक्यातील पांच प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णांसाठी बिछाने वाटप करण्यात आले. प्रत्येकी पांच गाद्या आणि उशा यांचा समावेश त्यात आहे. कंपनीच्या ‘सीएसआर’ निधीतून या साहित्याचे वाटप झाले. अडरे, शिरगांव, दादर, रामपूर आणि कापरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना हे साहित्य देण्यात आले.
कंपनीच्या ‘सीएसआर कमिटी’चे सदस्य मानसिंग यादव आणि विनायक गोंधळी यांनी कंपनीच्या वतीने हे साहित्य आरोग्य केंद्रांकडे सुपूर्द केले. डॉ. यतीन मयेकर (अडरे), डॉ. श्रीमती कासारे (शिरगांव), डॉ. श्रीमती सोळवंडे (दादर), डॉ. श्रीमती शिर्के (रामपूर), डॉ. अंकुश यादव (कापरे) या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे साहित्य स्वीकारले. साहित्य प्रदानाचा हा उपक्रम सर्व ठिकाणी सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर यावर कटाक्ष ठेवून साधेपणाने आयोजित करण्यात आला होता.
www.konkantoday.com