
चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रवास मोफत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई व आसपासच्या भागातील चाकरमान्यांना कोकणात सहज आणि मोफत पोहोचता यावे म्हणून मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेस विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा यंदा १३ व्या वर्षीही सुरू असून, कोकणवासियांच्या सोयीसाठी दोन विशेष ट्रेन सज्ज करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे भक्तांना मोफत जेवण व पाण्याची सोय उपलब्ध असेल. मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, गेली १२ वर्षे ही सेवा अविरतपणे कोकणवासियांच्या सेवेत सुरू आहे. आणि यंदा दोन गाड्या विशेष म्हणून भक्तांसाठी सज्ज आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भाजप आणि राणे कुटुंबियांना भरभरून पाठिंबा दिल्यामुळे ही सेवा आणखी विशेष बनली आहे.
दि. २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकापासून या गाड्या सुटणार आहेत. तिकिट वितरण सोमवार दि. १८ ऑगस्टपासून सुरू होईल. इच्छूक नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करावी. दि. २३ ऑगस्ट दादर (प्लॅटफॉर्म १४) रत्नागिरी, कुडाळ आणि थांबा-सावंतवाडी, दि. २४ ऑगस्ट दादर (प्लॅटर्फार्म १४) वैभववाडी, कणकवली अशा रेल्वेफेर्या होणार आहेत.www.konkantoday.com