रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ३२ गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली
कोरोना विषाणूच्या साथीमुळे थांबलेल्या गाड्या पुन्हा रुळावर आणण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून गाड्यांच्या संख्येत हळहळू वाढ करण्यात येत आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ३२ गाड्या पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की, ‘भारतीय रेल्वे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी रेल्वेची संख्या वाढविण्यात आली आहे. रेल्वेने गरीब रथ, ताज एक्स्प्रेस, शान-पंजाब आणि मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस अशा ३२ रेल्वे गाड्या नव्याने सुरु केल्या आहेत.
www.konkantoday.com