मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे प्रवाशांसाठी खुला, मराठा मोर्चा जुन्या हायवेवरून जाणार

_मुबंई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आत्ताची सर्वा मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आता प्रवाशांसाठी खुला असणार आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वात मुंबईकडे निघालेला मराठा मोर्चा जुन्या हायवेवरून मुंबईकडे जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला असणार आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांना जुन्या मार्गाहून जाण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता एक्सप्रेसवेवरून प्रवास करण्यास कोणताही अडचण येणार नाही. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.पोलिसांनी मराठा आंदोलकांना मार्ग दाखवून बंदोबस्त देखील तैनात केला आहे. हायवेवर ज्या ठिकाणांहून मराठा आंदोलक जुन्या हायवेवर वळणार आहेत तिथे बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत. तेथून सर्व आंदोलक जुन्या हायवेहून जाणार आहे अशी माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे. आंदोलकांची पुढील सर्व व्यवस्था देखील जुन्या हायवेवरून असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.पोलिसांच्या आवाहनाला मराठा आदोलकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता मुंबईकडे निघालेल्या मराठा मोर्चाचा मार्ग बदलला आहे. हा मोर्चा NH48 या जुन्या मुंबई-पुणे हायवेवरून वळवण्यात येणार आहे. हा मोर्चा ते शेडुंग टोल प्लाझापर्यंत पोहोचणार आहेत. गुरुवारी सकाळी कळंबोलीत न येता गव्हाण फाटा ओलांडून सायंकाळी पाम बीच रोडने बेलापूर जंक्शन येथे मोर्चा पोहोचेल. आज रात्री मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक एपीएमसी परिसरात रात्र काढणार आहेत. त्यानतंर शुक्रवारी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा दाखल होईल.लाखो मराठ्यांचाचा मोर्चा आज नवी मुंबईत दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत एपीएमसीतील पाचही मार्केट बंद राहणार आहेत. व्यापारी आणि माथाडी कामगार यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. एपीएमसी मार्केट आवारात मराठा आंदोलकांची जेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. चार भाकऱ्या प्रेमाच्या आणि आरक्षणाची शिदोरी असे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येते आहेत. पाहटेपासूनच मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांकडून जेवण बनवायला सुरुवात झाली आहे. येथील फळ बाजारात तब्बल 12 ते 15 हजार आंदोलकांचे जेवण बनवले जात आहे मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले असून नवी मुंबईत अडीच ते तीन हजार पोलिस तैणात करण्यात आले आहेत. सायन-पनवेल महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असणार आहे. लाखोंचा मोर्चा नवी मुंबई येणार असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैणात करण्यात आले आहेत. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button