माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत -शिवसेना आमदार प्रताप सरनाईक
भाजपाशी युती करा असं पत्र लिहिल्याने खळबळ माजवणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीविरोधातील आपली खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावर संकट आलं तेव्हा महाविकास आघाडीचे नेते माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिलं असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते विधानभवनात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
www.konkantpday.com