पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता कमी

आज पासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. कोरोनाचं संकट असल्यानं दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच विधानसभा अध्यक्ष पदासाठी आग्रही असलेल्या काँग्रेसला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.आजपासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. सरकारकडून कोविड परिस्थितीचं कारण देत निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button