खासगी व व्यापारी बँकांनी पीक कर्जवाटपात आखडता हात घेतला
राज्यात खरिपाच्या पेरण्या संपत आल्या, तरी लाखो शेतकर्यांना अजूनही पीक कर्जाचे वाटप झालेले नाही. यंदा सुमारे ६० लाख शेतकर्यांना पीककर्ज देण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत फक्त २३ लाख ९३ हजार शेतकर्यांनाच पीककर्ज मिळाले आहे.
खासगी व व्यापारी बँकांनी पीक कर्जवाटपात आखडता हात घेतल्याने राज्य सरकारपुढे शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा पेच निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, त्यानंतरही या बँकांनी दाद दिलेली नाही.
www.konkantoday.com