
काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी सतत धडपडणारा नेता हरपला
खेड तालुक्यातील कुंभाड गावचे सुपुत्र व गेली चार वर्षे जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा अतिशय यशस्वीपणे सांभाळणारे अॅड विजय भोसले यांचे आज सकाळी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. भोसले यांच्या अचानक जाण्याने जिल्हा काँग्रेसचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
नाबार्ड युनियन ऑल इंडियाचे सरचिटणीस असलेले अॅड विजय भोसले यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाः काम करायला सुरवात केली होती. सोनिया गांधी यांच्या निकटवर्ती गोठातील ते एक मानले जात असत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद स्विकारायाच्या आधी ते जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत होते. खेड तालुक्यात काँग्रेसची मजबूत फळी निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशिल असत. खेड तालुक्यातील अनेक
प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने छेडली होती. अलिकडच्या काळात जगबुडी नदीवरील पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत त्यांनी उपोषण आंदोलन छेडले होते.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बांधणीचे काम हाती घेतले होते. विशेष म्हणजे आलिकडच्या काळात त्यांच्या प्रयत्नांना चागले यश येतानाही दिसत होते. जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर आंदोलन छेडली होती. काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरु असे. २००९ च्या निवडणुकीत त्यांनी दापोली विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणुक देखील लढवली होती. मात्र या निवडणुकीत हार पत्करावी लागली होती.त्यानंतरही त्यानी कॉंग्रेसपक्षासाठी जोमाने कार्य चालू ठेवले होते
www.konkantoday.com
