राजापूर तालुक्यातील शिवसेनेला फटका अनेक पदाधिकारी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केला भाजपमधे जाहीर प्रवेश
नाणार प्रकल्पाला सतत विरोध करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपमधे जाहीर प्रवेश केला.
हा पक्ष प्रवेश सोहळा भाजप महाराष्ट्र राज्य सचिव व रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, भाजप लांजा तालुका अध्यक्ष मुन्ना खामकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जब्बार काझी, देवगड माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, युवा अध्यक्ष उत्तम बिर्जे, अनुसूचित जाती जमाती महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य प्राध्यापक मारुती कांबळे, सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य महादेव राव गोठणकर, सहकार आघाडी जिल्हा संयोजक अनिल कुमार करंगुटकर, महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस शिल्पा मराठे, जिल्हा कार्यकारणी सदस्य शितल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आज राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे, सागवे, जैतापूर, मिठगवाणे, अणसुरे, राजापूर येथील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.
प्रवेश करणाऱ्यामधे पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, सुरेश गावकर, निशांत गुरव, निरंजन गावकर, देवदत्त सरगाळे, विशाल काजवे, प्रवीण काजवे, निलेश चव्हाण, दिनेश चव्हाण, समीर मेस्त्री, सुनिल वेतकर, शिवदास वेतकर, कमलेश शिरवडकर, गजानन पाटणकर, अक्षय आंबेरकर, यश आंबेरकर, देवेंद्र आंबेरकर, गणेश आंबेरकर, प्रथमेश आदम, सोहम खडपे, तन्मय महाजन, अनंत प्रभुदेसाई, सुधीर आग्रे, संदीप पांचाळ, महेश आग्रे, रोशन आग्रे, प्रशांत नाणारकर, निखील गुरव, आकाश गुरव, ओंकार गोठणकर, अक्षय गुरव, अनिल देवरुखकर, प्रदीप तारळकर, समीर सुर्वे, सत्यवान सुर्वे, संजय वाघधरे, प्रकाश वाघधरे, संतोष वाघधरे प्रभाकर बांदीवडेकर, विष्णू बांदीवडेकर, मुरलीधर बांदीवडेकर, सुहास कुवरे, विजय मणचेकर, गोविंद मुळम, विजय गुरव, आशिष मालवणकर, लक्ष्मीकांत मुळम, रामचंद्र मुळम, सुनिल कुवरे, राजेंद्र वेलणकर, प्रथमेश शिरवडकर, हर्षद शिरवडकर यांच्यासह असंख्य शिवसैनिकांचा समावेश आहे.
www.konkantoday.com