रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ११७६ बालके कोरोनाबाधित
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाचा विळखा बसू लागला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना विळखा घातल्याचे पाहायला येत आहे.रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ११७६ बालके कोरोनाबाधित सापडली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा विळखा बसलेली बालके १४ वर्षाच्या आधी वयोगटाची आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात बालके बाधित होण्याचं प्रमाण ६.४४ टक्के एवढं आहे.
www.konkantoday.com