चिपळूणात तक्रार झालेल्या सावकारांच्या कार्यालयावर पोलिसांच्या धाडी
चिपळूण सावकारीविरोधात येथील पोलीस व सहायक निबंधक कार्यालयाने फास आवळण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दोन पथके तयार करून गुन्हा दाखल झालेल्या दोन आरोपींच्या कार्यालयांत धाड टाकली व पोलीस तपासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे व साहित्य जप्त केले आहे. याशिवाय पोलिसांनी सहायक निबंधक यांची भेट घेऊन याप्रकरणी पोलीस तपासाला प्रारंभ केला आहे. यामुळे शहर परिसरातील सावकारांचे धाबे दणाणले आहेत.
www.konkantoday.com