खेडमध्ये २७ बालके कोरोनाबाधित; पालकांची चिंता वाढली

खेड : खेड तालुक्यात लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला असल्याने पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहिती नुसार सद्यस्थितीत १४ वर्षाखाली तब्बल २७ रुग्ण कोरोनाबाधित असल्याने लहान मुलांमध्ये वाढणाऱ्या कोरोनाला रोखायचे कसे? हा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे,
दोन आठवड्यांपुर्वी कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाऱ्या सुसेरी क्रमांक १ येथील देऊळवाडी येथील चार लहान बालकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून या चारही बालकांवर येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले. सुदैवाने ही चारही बालके उपचारांना प्रतिसादही देत आहेत मात्र दरम्यानच्या काळात आणखी काही बालकांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून यायला लागल्याने आरोग्य विभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे.
मार्च २०२० च्या दुसऱ्या पंधरवड्यापासून खेडमध्ये कोरोनाने धुमाकुळ घालायला सुरुवात केली. ८ एप्रिल २०२० रोजी खेड तालुक्यातील अलसुरे गावातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि हा बळी रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला बळी ठरला. त्यानंतर कोरोना बळींची संख्या वाढतच गेली. ज्यांनी हाताची मुठ सैल सोडून वेळेत उपचार घेतले ते कसेबसे बचावले मात्र ज्यांना वेळेत उपचार घेणे शक्य झाले नाही त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आलेली कोरोनाची पहिली लाट जानेवारी 2021 मध्ये हळु हळु ओसरलेली पहावयास मिळाली. खेड तालुका हळुहळु कोरोनामुक्तीकडे वाटचाल करू लागल्याने खेडवाशियांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण हे फार काळ टिकले नाही. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी आंबवली विभागातील सनघर या गावामध्ये एका धार्मिक कार्यक्रमातरम्यान गावकरी एकत्र आले आणि कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाला. या एका गावात शेकडो गावकरी कोरोनाबाधित आढळून आले आणि बघता बघता कोरोना वायुवेगाने पसरू लागला.
फेब्रुवारी २०२१ पासून सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट भारच भयानक होती. या लाटेत अनेक युवकांचा बळी गेल्याने अनेक कुटुंब उद्धवस्त केली. व्यवसाय, नोकऱ्या गेल्याने आर्थिक घडी पुर्ण विस्कटून गेली. आता जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उबरट्यावर उभा असून लहान बालकांमध्ये दिसणारी कोरोनाची लक्षणे हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील कोरेगाव शिंदेवाडी ३, खेड शह ३, लोटे १, सुसेरी ४ खोपी २. भोस्ते १, आष्टी ३, नांदगाव १, कळंबणी ३, धामणंद ३ तर तिसे येथे अशा एकूण २७ लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली आहेत.
या सर्व कोरोनाबाधित मुलांना आरोग्य विभागाकडून योग्य ते उपचार सुरु असून त्यांच्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
सर्व कोरोनाबाधित मुलं उपचारांना प्रतिसाद देत असली तरी मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढायला लागल्याने पालकांची चिंता वाढली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button