
ट्रक वाहतूक बंद करण्याची जयगड ग्रामपंचायतीची मागणी
जयगड परिसरातील जिंदाल उद्योग समूह व लावगण डॉकयार्ड यांचे ट्रक वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी जयगड ग्रामपंचायतीमार्फत कंपन्यांना देण्यात आली आहे या कंपन्यांमध्ये विविध भागातून ट्रक ट्रेलर अपरात्री येतात या ट्रकमध्ये परराज्यातील वाहक व अन्य लोकांचा समावेश असताे तसेचे वाहक तोंडाला मास्क बांधत नसल्याचे आढळून आले आहे त्यांना या साथीच्या रोगाच्या वेळी आरोग्याविषयी योग्य ती काळजी घेण्यास सांगावी तसेच येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण कंपनीने करावे जर असे झाले नाही तर ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येईल वाहतूक बंद करावी लागेल
www.konkantoday.com