राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मात्र ते कुंभकर्णाच्या झोपेतून खडबडून जागे झाले -काँग्रेसचा अण्णा हजारे यांना टोला
जरंडेकर साखर कारखान्याप्रकरणी अण्णा हजारे यांच्या प्रतिक्रियेवरून मुंबई काँग्रेसने हजारे यांनी टोला लगावला आहे. भाजप सत्तेत असताना आम्ही त्यांच्या अनेक मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी बाहेर काढले, तेव्हा हजारे यांची निद्रावस्था भंग झाली नाही. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मात्र कुंभकर्णाच्या झोपेतून खडबडून जागे झाले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे.
www.konkantoday.com