
प्रसिध्द कला दिग्दर्शक राजू साप्ते यांची पुण्यातील राहत्या घऱी गळफास घेवून आत्महत्या
मराठी – हिंदी चित्रपट तसेच मालिकांचे प्रसिध्द कला दिग्दर्शक राजू साप्ते (५१) यांनी पुण्यातील राहत्या घऱी गळफास घेवून आत्महत्या केली. फिल्म स्टुडिओ आणि अलाईड मजदूर युनियनचे खजिनदार राकेश मौर्या यांच्या दादागिरीला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी तयार केला तो शनिवारी दिवसभर व्हायरल झाल्याने मराठी – हिंदी मालिका तसेच चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
www.konkantoday.com