
संगमेश्वर तालूक्याच्या शिरपेचात रोवला गेला एक मानाचा तुरा संगमेश्वर तालुक्यात आल पहिलवहिल युट्यूबच सिल्वर प्ले बटण
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालूक्यातील सुप्रसिद्ध युट्यूबर श्री संदेश फडकले यांनी कोकण संस्कृती या सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल ने एक लाख (१,००,०००) सबस्क्राईबर चा टप्पा पार केल्या बद्दल युट्यूब कडून संदेश फडकले यांच्या कोकण संस्कृती चॅनल ला सिल्वर प्ले बटन देवून सन्मानित करण्यात आले.
कोकण संस्कृती हे युट्यूब चॅनल कोकणातील पर्यटन, खाद्यसंस्कृती, निसर्ग सौंदर्य, सामाजिक, कोकणातील लोकांचे राहणीमान इत्यादी विषयांवर प्रकाश टाकण्याच काम संदेश मागील पाच वर्षांपासून करत आहेत. आईने चुलीवर बनवलेल जेवण इथून सुरु झालेला प्रवास आज ३७५ व्हिडिओ आणि एक लाख सबस्क्राईबर इथ पर्यंत यशस्वी रीत्या येवून पोहोचला आहे. जगभरातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक प्रतिष्ठित मान्यवरांकडून, स्थानिक सामाजिक, राजकिय क्षेत्रातून संदेश यांच्यावर शुभेच्छा वर्षाव व कौतूक होत आहे. आणि ह्या पुढे कोकणातील अखंड सर्वप्रकारच्या संस्कृतीच व निसर्ग सौंदर्य च दर्शन कोकण संस्कृती ह्या युट्यूब चॅनल द्वारे संबंध जगाला घडवण्याचा मानस संदेश फडकले यांनी व्यक्त केला आहे.
देवरुख येथे संदेश फडकले यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्याचे देवरुख येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुस्तू आर्ते यांच्या पुढाकाराने देवरुख गौरव समिती तर्फे सत्कार मंगवार दिनांक २९ जून २०२१ आयोजित करण्यात आला. त्याक्षणी सौ. रेवा कदम, श्री. प्रमोद हर्डीकर, श्री. सरताज कापडी, श्री. संजय सुर्वे श्री. राजू वनकुद्रे अश्या दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
