
मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांकडून सुपरफास्ट रेल्वेचे तिकिट दर
कोकण मार्गावरून धावणारी मध्य रेल्वेची मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांकडून सुपरफास्ट रेल्वेचे तिकिट दर आकारत आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांकडन जादा शुल्क आकारत असल्याच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेल्या बहुतांश रेल्वेगाड्या पुन्हा धावत आहेत. मात्र नियमित गाड्यांऐवजी मेल एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष तिकिट दराने या गाड्या चालवण्यात येत आहेत. १० फेब्रुवारीपासून कोकण मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेस चालवण्यात येत आहे. मात्र ही जनशताब्दी एक्स्प्रेस सुपरफास्ट नसतानाही प्रवाशांकडून सुपरफास्टचे शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ कि.मी. असणे आवश्यक असते. जनशताब्दी एक्स्प्रेसप्रमाणेच कोकण मार्गावर धावणार्या अन्य रेल्वेगाड्यांही सुपरफास्ट नसतानाही सुपरफास्टचे शुल्क आकारले जात आहे
www.konkantoday.com
