
माजी आमदार संजयराव कदम यांच्या पुढाकारातून भैरवनाथ कोविड सेंटर सुरू होणार
जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही तिसर्या लाटेत काय परिणाम होणार हे जरी समजून येत नसले तरी जनतेने सतर्क रहावे नव्हे तर आपली काळजी घ्यावी. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नात दापोली विधानसभेचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रेरणेतून खेड-दापोली येथे शंभर खाटांच्या भैरवनाथ कोविड सेंटरची उभारणी करणयात आली असुन त्या सेंटरचे उदघाटन माजी मंत्री, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवार दि. ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष स. तु. कदम यांनी दिली.
www.konkantoday.com




