बांधकाम केलेल्या शौचालयाचे बिल देण्यात नगर परिषद अन्याय करीत असल्याचा आरोप करीत ठेकेदाराने शाैचालयाला टाळे ठोकले
चिपळूण तालुक्यातील उक्ताड-कानसेवाडी येथे बांधलेल्या शौचालयाचे बिल देण्यात नगर परिषद अन्याय करीत असल्याचा आरोप करीत संबंधित ठेकेदाराने त्यास पुन्हा गुरूवारी टाळे ठोकले. नगर अभियंता परेश पवार हे मर्जीतील ठेकेदारांची बिले वाढवून अन्य ठेकेदारांवर अन्याय करीत असल्याचा आरोप माजी नगरसेवक भरत गांगण यांनी केला आहे.
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी ५८/२ चा वापर करीत शहरात काही ठिकाणी शौचालये बांधली. त्यातील उक्ताडचे एक शौचालय आहे. याचे काम विकास कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले होते. यासाठी सुमारे १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नगर परिषदेने अध्यादेश दिल्यानंतर ठेकेदार प्रशांत जाधव यांनी हे काम पूर्ण केले. मात्र महाविकास आघाडीने केलेल्या १९ कामांच्या तक्रारींचे कारण देत बिल देण्यास नकार दिला जात होता. त्यामुळे जाधव यांनी फेब्रुवारीत या शौचालयाला टाळे ठोकून प्रशासन व लोकप्रतिनिधींवर नामुष्की आणली. त्यानंतर बर्याच घडामोडी घडल्या. काही नगरसेवकांसह माजी नगरसेवकांना नागरिकांनी धारेवर धरत शिवीगाळ केली. त्यामुळे जाधव यांना समजावून टाळे काढण्यात आले हाेते
www.konkantoday.com