कोरोनाचे कालावधीत बंद असलेली मंडणगड-मिरज गाडी उद्यापासून धावणार

कोरोनाचे कालावधीत बंद असलेली मंडणगड-मिरज गाडी उद्या शुक्रवार दि. १९ फेब्रुवारीपासून परत सुरू होणार असल्याचे मंडणगड आगाराचेवतीने सांगण्यात आले आहे.
मिरज मार्गावर प्रवास करणारे रूग्ण, विद्यार्थी व प्रवाशी यांची गाडीअभावी मोठी गैयसोय झालेली होती. उद्यापासून मंडणगड बसस्थानकातून ही बस सकाळी ८.४५ वाजता मार्गस्थ होणार आहे. तर मिरज येथून रात्रौ १० वा. मंडणगडकडे येण्यासाठी मार्गस्थ होणार आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button