
निर्बंध शिथिल होताच घरविक्री आणि महसुलात वाढ
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधाच्या पाश्र्वाभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यात घरविक्री तसेच मुद्रांक शुल्क वसुलीत मोठी घट झाली. मात्र, निर्बंध शिथिल होताच घरविक्री आणि महसुलात वाढ होत असून मेमध्ये ६६ हजार ५३४ तर जूनमध्ये १ लाख ४५ हजार ३४९ घरे विकली गेली. त्याचप्रमाणे मे महिन्यात सरकारला घरविक्रीतून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने केवळ ८१४ कोटी रुपयांचा, तर जूनमध्ये १४९४ कोटींचा महसूल मिळाला आहे.
www.konkantoday.com