दोन दिवसात बांधकाम विभागाने चर न बुजवल्यास सावरकर चौक मित्रमंडळ गांधीगिरी करून चर भरणार
संगमेश्वर साखरपा नवीन रस्ता खोदून साडवली एमआयडीसी जवळ ग्रामपंचायतीने पाण्याची पाईपलाईन नेण्यासाठी खोदलेला चर पक्का न बुजवता थातुरमातुर काम केल्याने तो चर मोठा झाला आहे. यामुळे दुचाकीचे अपघात होत आहेत. येत्या दोन दिवसात बांधकाम विभागाने चर न बुजवल्यास सावरकर चौक मित्रमंडळ गांधीगिरी करून हा चर भरणार आहे, असे अध्यक्ष राजू वणकुद्रे व सल्लागार युयुत्सु आर्ते यांनी सांगितले.
www.konkantoday.com