
ग्रुप ग्रामपंचाय काळबादेवीचे ग्रामसेवक शिवकुमार पायधन यांची बदली झाल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने निरोप समारंभ
ग्रुप ग्रामपंचायत काळबादेवीचे ग्रामसेवक शिवकुमार पायधन ह्यांच्या चांगल्या सेवेनंतर त्यांची जिल्हा बदली झाल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करून निरोप देण्यात आला. पायधन यांनी या ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षे चांगली सेवा दिली होती. त्यांचे जागी ग्रामविकास अधिकारी ईंगळे यांनी कार्यभार स्विकारला असून त्यांचेही यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला काळबादेवी ग्रामपंचायत सरपंच तृप्ती पाटील, उपसरपंच सुमित भोळे, ग्रामपंचायत सदस्य आशिष कनगुटकर, समीर शेट्ये, मधुरा कारेकर, प्राची मयेकर व प्रीती मयेकर ,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
www.konkantoday.com