
इतर विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठानेही शिक्षण शुल्क कमी करावे
कोरोनाच्या काळातील मंदीचा विचार करून इतर विद्यापीठांप्रमाणेच कृषी विद्यापीठानेही शिक्षण शुल्क कमी करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
याबाबत अभाविपने डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाकडे मागणी केली आहे की, विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील एकूण शुल्कात कपात करून शिक्षण शुल्क वगळता इतर सर्व शुल्क माफ करावे. याबाबतचे निवेदन बुधवारी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला देण्यात आले. सध्याच्या कठीण काळात विद्यार्थी हीत पाहून लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा विद्यार्थी परिषद या विषयावर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी दिला.
www.konkantoday.com